logo

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यावतीने देण्यात येणारे कर्ज वाटप थांबल्यामुळे शेतकरी अडचणी ...... संबंधिताचे दुर्लक्ष

जिल्हा बँक कर्ज वाटप थांबल्याने शेतकरी अडचणीत: संबंधितांचे दुर्लक्ष

महेंद्र महाजन रिसोड: (वाशिम)
आर्थिक व्यवहाराचे चक्र थांबल्यास अनेकांचे जगणे मुश्किल होते. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक सांगितली जात असताना जिल्हा बँकेकडून सेवा सहकारी सोसायटी मार्फत नेहमीच शेतकऱ्यांची अडवणुक केली जाते.
अशातच आता निवडणुकांचे कारण पुढे करून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचा पीक कर्ज वाटप थांबवल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.
याकडे गाव पातळीवर निवडून दिलेले सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य व अध्यक्षाचे लक्ष नाहीं आहे. वर्षानुवर्ष जिल्हा बँकेची धुरा हाणणारे स्थानिक संचालक यांचे सुध्दा लक्ष नाहीं.
शेतकऱ्यावर मात्र ही अडवणूक होत असल्याने पुन्हा एकदा अडचणीची वेळ आली आहे.

याबाबत दरवर्षीच जिल्हा बँकेकडून सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत केलेल्या कर्जाची वसुलीही व्याजमाफीचे आमिष दाखवून ३१ मार्चपूर्वीच वसुली केली जाते.
शेतकरी पदरमोड करून किंवा हात उसने करून इकडून तिकडून पैसे जमा करून या कर्जाचा भरणा करतो. आठ दहा दिवसाच्या उसनवारीवर हे पैसै जमा करतो.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाटप मिळेल व ज्याचे त्याचे पैसे परत करून उरलेल्या पैशात प्रपंच व शेती ची तोंड मिळवणी केली जाते.
मात्र उसनवारीवर आणलेले पैसे वेळेत परत केले नाही तर शेतकऱ्यांची पत खराब होते.
शेतकऱ्यांचे सर्वच व्यवहार हे हातावर होत असल्याने व्यवहारात दिलेला शब्द पाळावा लागतो नाहीतर शेतकऱ्याला कोणीच ओळखत नाही. अशा स्थितीत जिल्हा बँकेमार्फत 20 एप्रिल नंतर वाटप सुरू होईल असे सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाकडून सांगितले जात होते.
मात्र 24 एप्रिल उलटली तरी वाटपाची कुठेच सुरुवात झाली नाही.
अशातच स्थानिक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व स्थानिक संचालक तथा आमदार यांचे सांगण्यावरून वाटप थांबविले असल्याचे जिल्हा बँकेकडून व सचिवमार्फत सांगितले जाते.
त्यातच शेतकऱ्याला घरातले काही विकायचे असल्यास बाजार समितीचे हळद मार्केटही सध्या बंद आहे.
निवडणुकांचे कारण सांगून जर शेतकऱ्यांची अशी अडवणूक होत असेल तर भीक नको पण आश्वासनाचे कुत्र्यावर अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. तर तात्काळ प्रभाव वाटप सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यात होत आहे

0
1747 views